वाहतूक पोलीस कर्मचार्यांचा शिट्टीचा आवाज दुर्मिळ होत असल्याने पोलीस आयुक्तांनी कानउघडणी करीत वाहतूक नियमन करताना शिट्टीचा वापर करावा. कर्मचार्यांनी वरिष्ठांना सॅल्युट करण्याऐवजी शिट्टी वाजवून त्यांचे अभिवादन करावे जेणे करून दुर्मिळ झालेली शिट्टीचा आवाज पुन्हा घुमेल.
आता आयुक्त वाहतूक कर्मचर्याच्या कामाच्या पद्धतीवर नाराज असल्याचे कळते. शहरातील वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलीस शिट्टीचा वापर करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रत्येक वाहतूक पोलिसांनी पॉईंटवर टोपी घालणे अनिवार्य असून शिट्टीचा वापर करावा.संध्याकाळी बॅटन, रिफ्लेकटर चा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत. तर वाहतूक कर्मचार्यांची शिट्टी वाजविण्याची सवय तुटू नये या साठी वरीष्ट पोलीस अधिकारी रस्त्यावरून जात असताना त्यांना सॅल्युट करण्या ऐवजी शिट्टी वाजवून अभिवादन करावे अशा सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या असल्याचे सूत्रानुसार कळते.